• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 17, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 17, 2026

रोहित पठारे हत्येचा तपास आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करा : हर्षवर्धन सपकाळ

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
रोहित पठारे हत्येचा तपास आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करा : हर्षवर्धन सपकाळ

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचा मागास वर्गीय समाजातील तरुण रोहित पठारे याची हत्या ही अत्यंत गंभीर घटना आहे. भाजपाच्या राजवटीत दलित मागासवर्गीय समाज सुरक्षित नाही असे या घटनेवरून दिसत आहे. पोलिसांचे गुन्हेगारांना भय राहिलेले नाही, गृहविभागावर देवेंद्र फडणवीस यांची पकड नाही म्हणून पठारे सारख्या हत्या सातत्याने होत आहेत. रोहित पठारे हत्येचा तपास समाधानकारक नाही, त्यामुळे सध्याची एसआयटी रद्द करून आयपीएस अधिकाऱ्याच्या एसआयटीमार्फत तपास करा, तपास पथकात वैजापूर बाहेरचे अधिकारी व महिला अधिकारी नियुक्त करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रोहित पठारेच्या कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत खासदार कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण डोणगावकर,  राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यातील खराब कायदा व सुव्यवस्थेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. रोहित पठारेची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे. पठारेची हत्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच विकृत पद्धतीने केली आहे. मराठवाड्यात व राज्यात अशा पद्धतीने होणाऱ्या हत्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. गुंडांची हिम्मत कशी होते, अशा विकृत्त पद्धतीने वागण्याची. राज्यात पोलीस नावाची यंत्रणा राहिलेली नाही, गुंडांना पोलिसांचे भय राहिलेले नाही. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याप्रमाणे पोलिसांचे वर्तन नसून महाराष्ट्र पोलीस खल प्रवृत्तीचे रक्षण करत आहेत, असेच या घटना पाहता दिसत आहे.

सपकाळ पुढे म्हणाले की, रोहित पठारे हत्याप्रकणातील आरोपी गजाआड झाले असले तरी कुटुंबाने दिलेली माहिती व स्थानिक पोलिसांनी केलेली कारवाई यात कुठेही साधर्म्य आढळून येत नाही, तपास योग्य मार्गाने होत नाही. घटनेवेळी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, स्थानिक पोलीसांच्या तपासावर पठारे कुटुंब समाधानी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून तत्काळ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटी गठीत करावी, परिवाराला तपासाबाबत अवगत करावे आणि पठारे कुटुंबाच्या शंकांचे समाधान करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Previous Post

स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक, पण बॅनरबाजीवर प्रशासनाचा शून्य वचक !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com