• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, November 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 18, 2026

राज्य बँकेचा १२ वा  ऐतिहासिक वेतन करार संपन्न

adminbyadmin
in मुंबई
0
सीएसआरचा वापर की ठेवींचे राजकारण? विद्याधर अनास्कर यांनी आरबीआयचे दरवाजे ठोठावले!

 सेवकांच्या वेतनात 16% भरघोस वाढ

 कुटुंब सुरक्षा कवच योजना व इतर भरघोस सुविधा

 सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचा सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीचा १२ वा ऐतिहासिक वेतन करार बुधवार दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्य बँकेच्या मुंबई येथील  मुख्य कार्यालयात संपन्न झाला.  या प्रसंगी को-ऑपेरटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसुळ व बँकेच्या एकूण ६ कर्मचारी संघटनांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

बाराव्या  ऐतिहासिक सेवकांच्या कराराचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे.

१. सेवकांच्या मागील वेतन करारामध्ये १२% वाढ दिली होती. त्यामध्ये भरघोस वाढ करुन यंदाच्या वेतन करारामध्ये 16% इतकी लक्षणीय वाढ देण्यात आली आहे.  यामुळे सेवकांच्या पगारामध्ये सरासरी रु.१५,५००/- इतकी वेतनवाढ होत आहे.

२. या वर्षाच्या वेतन करारामधील वैशिष्ट्य म्हणजे सेवा कालावधीत मयत झालेल्या कर्मचाऱयाच्या कुटुंबासाठी बँकेने सुरु केलेली `कुटुंब सुरक्षा कवच योजना’ होय. या योजनेनुसार सेवा काळात मयत झालेल्या कर्मचाऱयाला त्याच्या उर्वरित सेवेच्या प्रत्येक वर्षाला २ महिन्याचा पगार त्याच्या कुटुंबाला देण्यात येईल. तसेच त्याच्या घरातील पात्र व्यक्तीला बँकेच्या सेवेत घेण्याकरिता असलेली वयोमर्यादा ३५ वर्षापर्यंत ठेवण्यात आली असून, स्पर्धा परिक्षेमध्ये त्यांना २०% अधिक भारांकन (वेटेज) देण्यात आले आहे.

  1. या करारामध्ये प्रथमच मेट्रापोलिटन सिटीसाठी रु.५५००/- पर्यंत सिटी अलौन्स देण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱयांसाठी असलेल्या घरकर्ज  व इतर कर्ज सुविधा मर्यादांमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे.

    बँकेने नुकतेच सेवकांना १४.२५% बोनस देऊन त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे.

             या ऐतिहासिक कराराच्या प्रसंगी बोलताना को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री.आनंदराव अडसुळ यांनी नमुद केले की, बँकेची  प्रगती व कर्मचाऱ्यांची  प्रगती या परस्पर पूरक बाबी असाव्यात. बँकेच्या प्रगतीमध्ये सेवक संघटनांचा रचनात्मक सहभाग असावा. तसेच त्यांनी सेवकांना आवाहन करताना असे नमूद केले की, स्पर्धात्मक युगात कर्मचाऱयांनी आपली कार्यक्षमता, उत्पादकता, ग्राहक सेवेचा दर्जा सुधारणे तसेच डिजिटल बँकिंग प्रणाली आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.

         या प्रसंगी बोलताना बँकेचे प्रशासक श्री.विद्याधर अनास्कर यांनी असे नमूद केले की, सेवकांचे पगार,  त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु याबरोबरच प्रशासनाने सेवकांना भरघोस वाढ दिल्यानंतर सेवकांनी देखील त्यांच्याकडून अपेक्षित असणारी जबाबदारी पार पाडण्यात कसूर करु नये. तसेच बँकेच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देताना सेवकांनी कुठलीही कुचराई अथवा तडजोड करु नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

बँकेची दि. ३१.०३.२०२६ अखेरची सांपत्तीक स्थिती पुढील प्रमाणे.

 

अ. क्र. तपशील दि. ३१ मार्च २०२६ अखेरील आर्थिक स्थिती
१ सीआरएआर १८.५०%
२ नेटवर्थ रु ५, ७४७ कोटी
३ स्वनिधी रु ८,१७५ कोटी
४ एकूण व्यवसाय रु ५६,२४९ कोटी
५ नेट एन.पी.ए. १.६४%
६ प्रती कर्मचारी व्यवहार रु ६८ कोटी

 

         इतिहासात प्रथमच प्रशासनाने सेवकांना दिलेली १६% इतकी भरघोस पगारवाढ व जाहीर केलेल्या सोई-सुविधा यामुळे सर्व कर्मचारी संघटनांनी व कर्मचाऱयांनी समाधान व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले.

Previous Post

सावरकरांच्या सन्मानासाठी मैदानात उतरले अन् बाळासाहेबांचाच फोटो फाडला!

Next Post

महाराष्ट्र वेतन नियम, २०२६ लागू; कामगारांच्या वेतन संरक्षणाला बळ : कामगार मंत्री आकाश फुंडकर

Next Post
मुंबईतील एनटीसी मिल कामगारांना थकीत वेतन अदा करण्यासाठी राज्य शासन सक्रीय भूमिका घेणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

महाराष्ट्र वेतन नियम, २०२६ लागू; कामगारांच्या वेतन संरक्षणाला बळ : कामगार मंत्री आकाश फुंडकर

स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी मंत्री नितेश राणे सरसावले!

स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी मंत्री नितेश राणे सरसावले!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com