• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, November 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 18, 2026

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत ‘शौचालय स्वच्छता विशेष मोहीम’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत ‘शौचालय स्वच्छता विशेष मोहीम’

सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : देशातील सर्वात स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांकाचा बहुमान प्राप्त केल्यानंतर हा क्रमांक ही जबाबदारी असल्याच्या भावनेतून महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सर्व यंत्रणा अधिक जागरूकतेने कार्यरत झालेली आहे.

या अनुषंगाने शौचालय स्वच्छतेचे आणि आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन १९ नोव्हेंबर रोजीच्या ‘जागतिक शौचालय दिना’चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने संपूर्ण शहरात ‘शौचालय स्वच्छता विशेष मोहीम’ राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत नवी मुंबई शहर नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत देशात अग्रस्थानी राहिले आहे. हीच परंपरा कायम राखण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील सर्व आठही विभागांतील (बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा) सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची सखोल स्वच्छता करण्यात येत आहे तसेच जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. त्यासोबतच शौचालयांमधील पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, तुटलेले दरवाजे, नळ आणि ड्रेनेज लाईनची तपासणी करून तात्काळ दुरुस्तीची कामे पूर्ण केली जात आहेत. सर्व शौचालयांमध्ये हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉश, पुरेसे पाणी, प्रकाश व्यवस्था कार्यरत असल्याची खात्री केली जात आहे. त्यासोबतच शौचालयांचा योग्य वापर कसा करावा आणि स्वच्छता कशी राखावी, याबाबत विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

या मोहीमेनिमित्त सार्वजनिक व सामुदायिक शौचालये ही आपलीच मालमत्ता असून त्यांचा वापर करताना स्वच्छतेचे नियम पाळावेत. कोठेही अस्वच्छता आढळल्यास महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवून शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

प्रकल्प रखडवणाऱ्यांना आता मुदतवाढ नाही; काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची अंतिम संधी : मंत्री नितेश राणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com