• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, November 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 18, 2026

प्रकल्प रखडवणाऱ्यांना आता मुदतवाढ नाही; काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची अंतिम संधी : मंत्री नितेश राणे

adminbyadmin
in मुंबई
0
प्रकल्प रखडवणाऱ्यांना आता मुदतवाढ नाही; काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची अंतिम संधी : मंत्री नितेश राणे

सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

मुंबई : दीर्घकाळ रखडलेल्या बंदर प्रकल्पांना अखेरची एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळ संचालक मंडळाने आढावा बैठकीत घेतला. या कालावधीत काम पूर्ण न केल्यास संबंधित प्रकल्प आपोआप रद्द होईल. त्यानंतर मुदतवाढीचा प्रस्ताव मंडळासमोर आणू नये असे मंडळाचे अध्यक्ष आणि मत्स्यव्यव्साय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सागरी मंडळ संचालक मंडळाची ८९ वी बैठक बुधवारी महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या. या बैठकिला परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., वित्त विभागाचे उपसचिव सु. सि. पाटील उपस्थित होते.

काही कंपन्यांना २०१८ मध्ये देण्यात आलेल्या प्रकल्पांची मूळ पूर्णता मुदत २०२० पर्यंत होती. कोविड कालावधी आणि पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेमुळे या प्रकल्पांना तीन ते चार वेळा मुदतवाढ मिळाली आहे. प्रकल्पांना एसईआयएएची पर्यावरणीय मंजुरी मिळाली असून, खारफुटीविषयक उच्च न्यायालयीन परवानगीची प्रक्रिया प्रलंबित आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप बी. यांनी दिली.

यावर पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेचा आधार घेऊन प्रकल्प अनिश्चित काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. दीर्घ विलंबामुळे प्रकल्पाची किंमत, व्यवहार्यता आणि सार्वजनिक उपयोगिता प्रभावित होत असल्याने मुदतवाढीला निश्चित मर्यादा असणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

मुंबई वाटर मेट्रो हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रक्रियांना गती द्यावी असेही श्री राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सागरी धोरण २०२६ चा मसुदा मंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला. बैठकीत दिघी येथील मत्स्य उतराई केंद्राच्या निविदा आणि रेवदंडा येथील रो-रो जेट्टीच्या बांधकाम प्रस्तावावरही चर्चा झाली. संबंधित यंत्रणांना सर्व विलंबित प्रकल्पांची संपूर्ण यादी पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले. या यादीमध्ये प्रकल्प मंजुरीचे वर्ष, मूळ कालमर्यादा, आतापर्यंत दिलेल्या मुदतवाढी, विलंबाची कारणे, आवश्यक मंजुऱ्यांची सद्यस्थिती आणि कामाची प्रगती यांचा समावेश करावा. प्रकरणनिहाय निर्णय घेण्याऐवजी सर्व प्रलंबित प्रकल्पांचा एकत्रित आढावा घेऊन समान निकषांनुसार निर्णय घेतला जाईल असेही श्री राणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी उद्योग विभागाचे कक्ष अधिकारी गणेश कठाळे, अशासकिय सदस्य श्रीहरी देसाई, डॉ.परशराम पाटील, केंद्रिय बंदरे विभागाचे उपसंचालक प्रशांत पाटील, भारतीय नौसेनेचे प्रतिनिधी तन्मोय दास उपस्थित होते.

Previous Post

स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी मंत्री नितेश राणे सरसावले!

Next Post

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत ‘शौचालय स्वच्छता विशेष मोहीम’

Next Post
जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत ‘शौचालय स्वच्छता विशेष मोहीम’

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत ‘शौचालय स्वच्छता विशेष मोहीम’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com