• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, November 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 20, 2026

नवी मुंबईच्या देशातील प्रथम क्रमांकामागे गणेश नाईक यांची दूरदृष्टी!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबईच्या देशातील प्रथम क्रमांकामागे गणेश नाईक यांची दूरदृष्टी!

स्वच्छता कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे स्थायी समिती सभेत अशोक पाटील यांच्याकडून अभिनंदन

विद्युत विभागाच्या कारभारावर मात्र नाराजी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सुमारे ४ हजार ८०० शहरांमध्ये नवी मुंबई महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या यशामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शहराच्या नियोजनबद्ध उभारणीपासून स्वच्छतेच्या चळवळीपर्यंत राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे लोकनेते गणेश नाईक यांची दूरदृष्टी, विकासाची संकल्पना आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचे प्रतिपादन स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी केले. स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी स्वच्छता कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले. मात्र, याच बैठकीत विद्युत विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना जाबही विचारण्यात आला.

स्थायी समितीच्या सभेत बोलताना अशोक पाटील यांनी नवी मुंबईच्या स्वच्छतेतील ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला. शहराची उभारणी करताना रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि नागरी सुविधांचे नियोजनबद्ध जाळे निर्माण करण्यात आले. या पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईने स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात सातत्याने अव्वल स्थान राखले, तर देशपातळीवरही तृतीय क्रमांकापर्यंत मजल मारली. आता देशातील सर्व शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळविणे ही नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबईला देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगत अशोक पाटील यांनी त्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. शहरातील मुख्य रस्ते, गावठाणे, झोपडपट्ट्या, अंतर्गत परिसर आणि प्रत्येक प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या कष्टांमुळेच शहराने स्वच्छतेचा राष्ट्रीय स्तरावरील मान मिळविला आहे. त्यामुळे या यशाचे खरे शिलेदार स्वच्छता कर्मचारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर नागरिकांनीही आपल्या घराप्रमाणे सार्वजनिक परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, सभागृहनेते सागर नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सर्व नगरसेवक आणि महापालिका प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांकडे लक्ष दिल्याने शहराच्या विकासाला गती मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामे आणि लेखापरीक्षणासंदर्भातील विषयांवरही चर्चा झाली. महापालिकेच्या काही अर्थसंकल्पीय शीर्षांमध्ये निधी शिल्लक असताना अन्य काही शीर्षांमध्ये निधीची कमतरता निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे सर्व विभागांकडून अर्थसंकल्पीय तरतुदी आणि प्रत्यक्ष खर्चाची सविस्तर माहिती मागवून निधीचा योग्य समतोल राखण्याच्या सूचना अशोक पाटील यांनी दिल्या. पुढील बैठकीत याचा सविस्तर आढावा घेऊन विकासकामांना निधीअभावी अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.

महापालिकेच्या विद्युत विभागातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी देण्यात येणाऱ्या मुदतवाढीचा विषय बैठकीत चर्चेला आला. निवडणुकीपूर्वी आवश्यक असलेल्या निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करीत अशोक पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. विद्युत विभागाच्या काही कामांमध्ये अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संपूर्ण नवी मुंबईतील विद्युत देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर अहवाल पुढील स्थायी समिती सभेत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कंत्राटी कामगारांच्या मानधनवाढीचा प्रश्नही स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. सभागृहनेते सागर नाईक यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सभागृहात ठराव मंजूर झाल्यानंतर पात्र कंत्राटी कामगारांना दरमहा ७ हजार ५०० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची भूमिका अशोक पाटील यांनी स्पष्ट केली.

यासाठी संबंधित कंत्राटदारांनी कामगारांची बँक खातेविषयक माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि इतर तपशील लेखी स्वरूपात सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पात्र कामगारांच्या अर्जांची व कागदपत्रांची पूर्तता करून येत्या महिनाभरात वाढीव मानधनाचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभाग आणि कंत्राटदारांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळवून नवी मुंबईने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, हा लौकिक कायम राखतानाच शहरातील विकासकामांचा दर्जा, विद्युत विभागाचे कामकाज आणि कंत्राटी कामगारांचे प्रश्न यांनाही प्राधान्य देण्याची गरज आहे. स्वच्छतेतील यशाचा आनंद साजरा करतानाच नागरी सुविधांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने काम करावे, असा सूर स्थायी समितीच्या चर्चेतून उमटला.

Previous Post

नवी मुंबईच्या जडणघडणीतील योगदानाचा सन्मान; मनपा शाळेला कै. तुकाराम नाईक यांचे नाव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com