• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2026

अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

अनधिकृत शिकवणी वर्गांवर कारवाई कधी? मनविसेचा महापालिकेला सवाल

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अनधिकृत शिकवणी वर्गांवर कारवाई करण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. मनविसेचे शहर अध्यक्ष संदेश रविंद्र डोंगरे यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाईऐवजी केवळ पत्रव्यवहार सुरू असल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील अनधिकृत तसेच स्ट्रक्चरल ऑडिट न केलेल्या शिकवणी वर्गांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी डोंगरे यांनी २५ जून २०२६ रोजी महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र, या मागणीची दखल घेऊनही संबंधित विभागाकडून अहवाल सादर करण्यात आला नाही. अखेर २८ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त (१) सुनील पवार यांच्या स्वाक्षरीने संबंधित विभागाला स्मरणपत्र जारी करण्यात आले. तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

विशेष म्हणजे, अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीने स्मरणपत्र निघूनही कारवाईचा ठोस परिणाम दिसत नसल्याने प्रशासनातील विभागीय समन्वय आणि जबाबदारी निश्चितीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही संबंधित विभाग जुमानत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय, असा सवाल मनविसेकडून उपस्थित केला जात आहे.

शिकवणी वर्गांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अशा ठिकाणी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, अग्निसुरक्षा, आवश्यक परवानग्या आणि आपत्कालीन सुरक्षाव्यवस्थेची तपासणी होणे अनिवार्य आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच कारवाई करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित विषयात प्रशासनाचा हा चालढकलपणा खपवून घेतला जाणार नाही. केवळ कागदी घोडे नाचवण्याऐवजी अनधिकृत शिकवणी वर्गांची तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी; अन्यथा मनविसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहर अध्यक्ष संदेश रविंद्र डोंगरे यांनी दिला आहे.

Previous Post

मुस्लिम समाजातील गुन्हेगार ‘टाइम बॉम्ब’ आणि इतर धर्माचा ‘फुलबाजा’ का?: सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com