• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2026

मुस्लिम समाजातील गुन्हेगार ‘टाइम बॉम्ब’ आणि इतर धर्माचा ‘फुलबाजा’ का?: सचिन सावंत

adminbyadmin
in मुंबई
0
सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का?: सचिन सावंत

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

मुंबई : गुन्हेगारी मानसिकतेला कोणताही धर्म नसतो, ती एक मानवी प्रवृत्ती आहे, त्यामुळे गुन्हेगारांची धर्माच्या आधारावर विभागणी करणे किंवा अपराध्याचा धर्म पाहून त्या धर्माला लक्ष्य करणे, हे भारतीय संविधानाच्या समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुतेच्या मूल्यांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला ‘टाइम बॉम्ब’ ठरवायचे आणि इतरांनी गुन्हा केला तर तो ‘फुलबाजा’ का? असे दुहेरी निकष भाजपकडून जाणीवपूर्वक पुढे केले जात आहेत असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत पुढे म्हणाले की, कुर्ल्यात तरुण मुलामुलींना काही जणांनी केलेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कायदा हातात घेण्याची मुभा कोणालाही असता कामा नये. मात्र, राज्यात अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत असताना केवळ निवडक घटनांना धार्मिक रंग देऊन राजकीय ध्रुवीकरण करणेही तितकेच चुकीचे आहे. महाराष्ट्रातील ढासळती कायदा आणि सुव्यवस्था ही गंभीर चिंतेची बाब आहे. बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली दहशत असो किंवा पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटना असोत, परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. महिलांवर तर खुलेआम अत्याचार होत आहेत. गुन्हेगाराचा धर्म पाहू नका, त्याने केलेला गुन्हा पाहा. गुन्हेगारीचा बिमोड आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले, तरच एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा उजळेल. नाहीतरी भाजपाच्या राज्यात बिहार बरा अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

Previous Post

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते ६ कोटी ५० लाख रुपयांच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

Next Post
अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com