• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2026

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते ६ कोटी ५० लाख रुपयांच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते ६ कोटी ५० लाख रुपयांच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहर व ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती

दत्ता वऱ्हाडी : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

येवला : मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. रस्ते विकास हा सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा भाग असून गावांना शहराशी जोडण्यासाठी तसेच नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते आवश्यक आहेत. या रस्त्यांमुळे दळणवळणासह शेतमालाच्या वाहतुकीला चालना मिळेल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

येवला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून विविध रस्ते विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. याच विकासकामांच्या अनुषंगाने एकूण ६ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध रस्ते कामांचे भूमिपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की,  येवला शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणेमुळे परिसरातील गावांचा शहराशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे. यामुळे नागरिकांचे दळणवळण वाढण्यासोबतच शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. शेतीमालाची वाहतूक, व्यापार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला या रस्त्यांमुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 ते पुढे म्हणाले की, मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावीत. कामे सुरू असताना संबंधित यंत्रणांनी गुणवत्ता आणि कामाच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावे. विकासकामांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 ते म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि पाण्याची बचत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. येणाऱ्या काळात येवला मतदारसंघात आणखी विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

 या कार्यक्रमास येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते संभाजी पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते दीपक लोणारी, शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे, नगरसेवक प्रवीण बनकर, गोटू मांजरे, जावेद लखपती, रतन बोरनारे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, मलिक मेंबर, संतोष खैरनार, विनोद ठोंबरे, देविदास निकम, सतीश पैठणकर, सचिन सोनवणे, सुमित थोरात, भूषण लाघवे, नवनाथ थोरात, सौरभ जगताप, दीपक पवार, शरद आहेर, तुळशीराम जाधव, अरुण जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला क्रीडा संकुल, येसगाव साठवण तलाव, कृषी भवन, गंगासागर तलाव या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

  माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते या विकास कामांचे झाले भूमिपूजन

 रामा -१० (प्ररामा ८) ते नांदुर सुकी रस्ता ते रामा २५ रस्ता ते रेल्वे स्टेशन ते रामा १० रस्ता सुधारणा करणे प्रजिमा-७९ किमी १/५०० ते २/५००, ता. येवला, जि. नाशिक या रस्‍ता कामाचे भुमीपूजन करणे – र.रु. १ कोटी ५० लाख

 – प्र.जि.मा. ७९ येवला गणेशपूर (सुकी) हडपसावरगांव जायदरे प्र.जि.मा. ७० रस्ता प्रजिमा १६२ किमी ०/०० ते ५/९०० जि. नाशिक ता. येवला ची सुधारणा करणे या रस्‍ता कामाचे भुमीपूजन करणे – र.रु. २ कोटी ५० लाख

 – दिघवत पाटोदा सावरगाव नगरसुल वाईबोथी भारम रस्ता रामा-४५२ कि.मी २५/३०० ते २९/३०० व ३३/३०० ते ३४/९०० ची सुधारणा करणे ता. येवला या रस्‍ता कामाचे भुमीपूजन – र.रु. २ कोटी ५० लाख

Previous Post

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरात नवी मुंबई महापालिकेच्या विशेष पथकाची स्वच्छतासेवा

Next Post

मुस्लिम समाजातील गुन्हेगार ‘टाइम बॉम्ब’ आणि इतर धर्माचा ‘फुलबाजा’ का?: सचिन सावंत

Next Post
सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का?: सचिन सावंत

मुस्लिम समाजातील गुन्हेगार ‘टाइम बॉम्ब’ आणि इतर धर्माचा ‘फुलबाजा’ का?: सचिन सावंत

अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com