• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2026

जन्मठेपेची शिक्षा अन् काही क्षणांत पाचव्या मजल्यावरून उडी! बेलापूर न्यायालयात आरोपीचा मृत्यू

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
जन्मठेपेची शिक्षा अन् काही क्षणांत पाचव्या मजल्यावरून उडी! बेलापूर न्यायालयात आरोपीचा मृत्यू

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : बेलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी (२३ नोव्हेंबर) दुपारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी नागेश बाबू लाड याने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश बाबू लाड याच्याविरोधात २०१९ मध्ये नेरूळ पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ आणि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नी ज्योत्स्ना हिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःच्या बहिणी सुनीता सिंह हिची हत्या केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी त्याला तुर्भे नाका परिसरातून अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन प्रक्रियेला सामोरा जात होता.

सोमवारी या खटल्याचा निकाल बेलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावण्यात आला. न्यायालयाने नागेश लाड याला बहिणीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची, तर पत्नीच्या हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे. न्यायालयीन निकालानंतर पुढील प्रक्रिया सुरू असताना त्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारली.

या घटनेनंतर न्यायालयातील कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतली. जखमी अवस्थेतील नागेशला अपोलो रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या घटनेची नोंद सीबीडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, आरोपी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पाचव्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला आणि सुरक्षेच्या व्यवस्थेत नेमकी कुठे त्रुटी राहिली, याचा तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.

न्यायालयाच्या इमारतीत आरोपीच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? पोलिस बंदोबस्त असतानाही अशी घटना कशी घडली? या घटनेनंतर न्यायालयीन इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, मोकळ्या जागा आणि प्रत्येक मजल्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

२०१९ पासून आजपर्यतच्या घटनेचा मागोवा

  • गुन्ह्याचे कारण – नागेश लाड याला आपली पत्नी ज्योत्स्ना हिचे सख्ख्या बहिणीचा पती (मेहुणा) जरमिल सिंग ऊर्फ अजय सिंग याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

  • पत्नीवर जीवघेणा हल्ला – १७ जुलै २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास नागेशने नवी मुंबईतील कुकशेत गावात पत्नीच्या माहेरच्या घराच्या गच्चीवर तिच्यावर चाकूने सपासप वार केले आणि तिचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली होती.

  • बहिणीची निर्घृण हत्या- पत्नीवर हल्ला केल्यानंतर नागेश नेरूळ येथील आपली सख्खी बहीण सुनीता सिंग हिच्या घरी गेला. तिथे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात नागेशने बहिणीच्या छातीत चाकूने अनेक वार करून तिची हत्या केली.

  • अटक आणि कोठडी – या दुहेरी घटनेनंतर नेरूळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार झालेल्या नागेशला पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तुर्भे नाका परिसरातून अटक केली होती आणि तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.

  • न्यायालयाचा निकाल – तब्बल सात वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर बेलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रसन्ना चांदगुडे यांनी उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे नागेशला दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला बहिणीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप आणि पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.

Previous Post

खिल्लार ‘राणा’चा भाव वधारला! १७ लाख ११ हजारांची विक्रमी बोली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com