• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2026

खिल्लार ‘राणा’चा भाव वधारला! १७ लाख ११ हजारांची विक्रमी बोली

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
खिल्लार ‘राणा’चा भाव वधारला! १७ लाख ११ हजारांची विक्रमी बोली

दीड वर्षापूर्वी २ लाख १० हजारांना घेतलेला बैल आता थेट पठारे यांच्या ताफ्यात!

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

जुन्नर :  बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवायचा म्हटले की बैलात दम, पळण्यात वेग आणि अंगात रग असावी लागते! असाच आपल्या वेगाने आणि चपळाईने पुणे जिल्ह्यातील अनेक घाट गाजवणारा अवसरी बुद्रुकचा खिल्लार जातीचा ‘राणा’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या रुबाबदार शर्यतीच्या बैलाला तब्बल १७ लाख ११ हजार रुपयांची विक्रमी किंमत मिळाली असून, बैलगाडा शौकिनांमध्ये या व्यवहाराची जोरदार चर्चा रंगली आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी आणि बैलगाडा मालक अजित शरदराव चव्हाण व मनोज शरदराव चव्हाण या बंधूंच्या मालकीचा ‘राणा’ हा खिल्लार जातीचा बैल आहे. अवघ्या दीड वर्षापूर्वी त्यांनी जुन्नर येथून राणाला २ लाख १० हजार रुपये मोजून खरेदी केले होते. मात्र, त्यानंतर राणाने आपल्या धावण्याच्या जोरावर आणि मैदानातील कामगिरीने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली.

पुणे जिल्ह्यातील अनेक गावांच्या घाटात राणाने आपल्या पळण्याचा ठसा उमटवला. त्याच्या वेगाला आणि चपळाईला शौकिनांची दाद मिळाली. वर्षभराच्या कालावधीत त्याने एक बुलेट मोटारसायकल, तीन लाख रुपयांहून अधिक रोख बक्षिसे आणि अनेक सन्मानचिन्हे पटकावली. त्यामुळे राणाची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली.

अखेर चऱ्होली बुद्रुक येथील सुनीलतात्या निवृत्ती पठारे बैलगाडा संघटनेने तब्बल १७ लाख ११ हजार रुपये मोजून राणाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. अवघ्या दीड वर्षात २ लाख १० हजारांवरून १७ लाख ११ हजारांपर्यंत पोहोचलेला राणाचा हा प्रवास बैलगाडा शर्यतीच्या मैदानातील त्याच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरला आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यत हा केवळ खेळ नसून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, प्रतिष्ठेचा आणि हौसेचा विषय आहे. बैलाची जात, बांधा, ताकद, वेग आणि घाटातील कामगिरी यावर त्याची किंमत ठरत असते. राणाला मिळालेल्या या मोठ्या किमतीमुळे खिल्लार बैलांच्या बाजारात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

‘राणा’च्या या विक्रमी व्यवहारामुळे अवसरी बुद्रुकच्या चव्हाण बंधूंच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, बैलगाडा शौकिनांच्या गप्पांमध्ये सध्या  केवळ राणा हे एकच नाव घुमत आहे.

Previous Post

अतिरिक्त आयुक्तांचे स्मरणपत्रही केराच्या टोपलीत!

Next Post

जन्मठेपेची शिक्षा अन् काही क्षणांत पाचव्या मजल्यावरून उडी! बेलापूर न्यायालयात आरोपीचा मृत्यू

Next Post
जन्मठेपेची शिक्षा अन् काही क्षणांत पाचव्या मजल्यावरून उडी! बेलापूर न्यायालयात आरोपीचा मृत्यू

जन्मठेपेची शिक्षा अन् काही क्षणांत पाचव्या मजल्यावरून उडी! बेलापूर न्यायालयात आरोपीचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com