• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 24, 2026

संदीप नाईकांचा ‘जनसंवाद’ ठरतोय समस्यांच्या निराकरणाचे प्रभावी व्यासपीठ !

adminbyadmin
in नवी मुंबई
0
संदीप नाईकांचा ‘जनसंवाद’ ठरतोय समस्यांच्या निराकरणाचे प्रभावी व्यासपीठ !

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल

अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून कार्यवाहीचे निर्देश

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य

नवी मुंबई : नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या भूमिकेतून माजी आमदार संदीप नाईक यांचा नियमित ‘जनसंवाद’ उपक्रम सोमवारी बेलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला. या उपक्रमाला विविध समस्या आणि अडचणी घेऊन आलेल्या नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या सोडविण्यासाठी संदीप नाईक यांनी तातडीने पुढाकार घेतला.

नागरी सुविधा, शैक्षणिक प्रश्न, रोजगाराच्या संधी तसेच अन्य सार्वजनिक समस्यांबाबत नागरिकांनी यावेळी निवेदने सादर केली. प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संदीप नाईक यांनी संबंधित नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. ज्या समस्या तातडीने सोडविणे शक्य होते, त्यासाठी त्यांनी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून थेट संपर्क साधत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे काही प्रश्नांवर जनसंवादाच्या ठिकाणीच कार्यवाहीला सुरुवात झाली. उर्वरित निवेदनांबाबतही कालमर्यादेत पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

केवळ तक्रारी ऐकण्यापेक्षा त्यांचे निराकरण करण्यावर भर हे संदीप नाईक यांच्या जनसंवाद उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरत आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि संबंधित यंत्रणेपर्यंत त्यांचा आवाज पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.

“नागरिकांच्या समस्या या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तो लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. जनसंवाद हा केवळ आश्वासने देण्याचा उपक्रम नसून नागरिकांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना दिलासा देण्याचे माध्यम आहे,” अशी भूमिका संदीप नाईक यांनी यावेळी मांडली.

नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करताना प्रत्यक्ष संवाद, तातडीची दखल आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या त्रिसूत्रीवर संदीप नाईक यांनी भर दिला आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न यापुढेही अखंड सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

जन्मठेपेची शिक्षा अन् काही क्षणांत पाचव्या मजल्यावरून उडी! बेलापूर न्यायालयात आरोपीचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com