• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, November 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 25, 2026

पुण्यात न्यायालयाच्या दारात अराजकतेचा कळस, महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का?: हर्षवर्धन सपकाळ

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ 

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
मुंबई : न्यायालयाच्या दारात गोळीबार होतो हे अराजकतेचे लक्षण असून गुन्हेगारांना कायद्याचे वा पोलिसांचे काही भय राहिलेले नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असतानाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ते मान्य करत नाहीत कारण त्यांना कशाचेही गांभिर्य नाही. फडणवीसांना महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा आहे का ? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
शिवशंभू स्वराज्य संघटनेने महाड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली तसेच पाचड येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीला मानवंदना दिली.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा मोठा गाजावाजा केला पण मागील १२ वर्षांपासून हा महामार्ग अजून पूर्ण झालेला नाही. या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून लाडक्या ठेकेदारासाठी १२ वर्षांपासून कोकणच्या जनतेला वेठीस धरले आहे. मुंबई गोवा महामार्ग हा नितीन गडकरी यांच्या नाकर्तेपणाचा उत्तम नमुना आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
अदानी-अंबानी यांचे हायड्रो प्रकल्प व खाणींना भाजपा सरकार मान्यता देत असून या प्रकल्पांमुळे कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रकल्पांसाठी झाडांची कत्तलही प्रचंड प्रमाणात केली जात आहे, ती थांबवली पाहिजे पण भाजपा महायुती सरकार उद्योगपतींसाठी कोकणची जनता व पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक प्रकल्पांतून रसायनयुक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे, त्यामुळे पाणीही दुषीत झाले आहे. कोकणात प्रकल्प आले पाहिजेत, ज्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे, कोकणचा विकास झाला पाहिजे पण हे प्रकल्प कोकणच्या हिताचे नाही तर कोकणच्या अस्तित्वावर घाला घालणारे आहेत.
राज्यात यावर्षी भिषण दुष्काळ पडला आहे, शेतकरी शेतमजूर व सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. चारा पाण्याची मोठी समस्या असून पिण्याच्या पाण्याची टंचाईही आहे. सरकारने ३१० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत पण त्यातही हेवेदावे केले आहेत. दुष्काळ जाहीर करून मदतीची घोषणाही केली. दिवाळीआधी सर्व पात्र शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत थेट बँक खात्यात जमा होईल असा दावा सरकारने केला होता पण दिवाळी संपली तरी आजही लाखो शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. महायुती सरकारने दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Previous Post

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आळंदीतील आगरी समाज धर्मशाळेसाठी दोन कोटींची देणगी

Next Post

प्रभु श्रीरामांच्या शौर्याचा अवमान आणि रावणाचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात सानपाडा येथे आंदोलन

Next Post
प्रभु श्रीरामांच्या शौर्याचा अवमान आणि रावणाचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात सानपाडा येथे आंदोलन

प्रभु श्रीरामांच्या शौर्याचा अवमान आणि रावणाचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात सानपाडा येथे आंदोलन

दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रभाग १७ मध्ये जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात

दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रभाग १७ मध्ये जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात

माथाडी, हमाल आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यांत लवकरच सुधारणा

माथाडी, हमाल आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यांत लवकरच सुधारणा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com