• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2026

बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

नवी मुंबई महापालिकेचा विकासकांना इशारा

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

३० फूट उंच पत्रे, ग्रीन नेट, फॉगर मशीन आणि AQI मॉनिटर बंधनकारक

नवी मुंबई : शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे वाढणारे धूळ आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता विकासकांवर नियमपालनाची सक्ती करण्याची भूमिका घेतली आहे. बांधकाम परवानगीधारक आणि विकासकांनी वायू व ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मानक कार्यप्रणालीचे (SOP) काटेकोर पालन करावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सहायक संचालक, नगररचना सोमणाथ केकाण यांनी बांधकाम परवानगीधारक आणि विकासकांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत बांधकामस्थळांवर प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या Suo Motu Public Interest Litigation No. ३ of २०२३ या प्रकरणात वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील धूळप्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. उच्चस्तरीय समितीच्या (HPC) बैठकीतही या विषयावर चर्चा झाली असून, बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी संबंधित विकासक आणि वास्तुविशारदांना जबाबदार धरून SOP नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बांधकामस्थळी या उपाययोजना अनिवार्य

बांधकाम सुरू असलेल्या भूखंडाभोवती ३० फूट उंचीचे पत्रे आणि ग्रीन नेट लावणे, धूळ नियंत्रणासाठी फॉगर मशीन व स्प्रिंकलर बसविणे, हवेतील प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी AQI डिजिटल मॉनिटर लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, तसेच बांधकाम परिसरातील पदपथ आणि रस्ते नियमित स्वच्छ ठेवणे या उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

रात्रीच्या खोदकामामुळे होणाऱ्या आवाजावरही नियंत्रण

बांधकामांसाठी तळघर खोदताना मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो. विशेषतः आसपासच्या निवासी परिसरातील नागरिकांना या आवाजाचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे विकासक आणि वास्तुविशारदांनी खोदकाम व ध्वनिप्रदूषण निर्माण करणारी कामे निर्धारित वेळेतच करावीत आणि परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वच्छ नवी मुंबईसाठी विकासकांनाही जबाबदारी

नवी मुंबईचे पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त राखणे ही केवळ महापालिका प्रशासनाचीच नव्हे, तर शहरातील प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विकासक आणि वास्तुविशारदांनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे गांभीर्याने पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे.

शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या वेगाबरोबरच नागरिकांना स्वच्छ हवा आणि शांततापूर्ण वातावरण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दिलेले हे निर्देश प्रत्यक्ष बांधकामस्थळांवर कितपत अंमलात येतात आणि नियमभंग करणाऱ्या विकासकांवर किती प्रभावी कारवाई होते, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अथर्व रवींद्र गाताडीची भारतीय नौदलात भरारी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com