• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2026

अथर्व रवींद्र गाताडीची भारतीय नौदलात भरारी

adminbyadmin
in पनवेल
0
अथर्व रवींद्र गाताडीची भारतीय नौदलात भरारी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अथर्व गाताडीला शुभाशीर्वाद!

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

पनवेल : भारतीय नौदलात निवड होऊन देशसेवेची संधी मिळविणाऱ्या कु. अथर्व रवींद्र गाताडी याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी अथर्वचे वडील रवींद्र भालचंद्र गाताडी, आई मीना गाताडी, काका प्रा. संदीप गाताडी, भाजपा उरण पूर्व मंडल अध्यक्ष शशिकांत पाटील तसेच प्रा. पंकज प्रमोद खारकर उपस्थित होते.

अथर्वचे वडील रवींद्र भालचंद्र गाताडी हे ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टमध्ये कार्यरत आहेत, तर त्याचे काका प्रा. संदीप गाताडी हे रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एका सामान्य कुटुंबातील मुलाने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलात प्रवेश मिळविणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासातून आणि कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा भारतीय नौदलात अधिकारी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत देशसेवेचे स्वप्न साकार करतो, तर दुसरीकडे सामान्य कुटुंबातील व्यक्ती शिक्षणाच्या माध्यमातून प्राध्यापकपदापर्यंत पोहोचते, ही त्यांच्या कार्यातून निर्माण झालेल्या प्रेरणादायी वातावरणाची साक्ष आहे. अथर्वने अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यदलातील अग्निवीर प्रक्रियेत यश मिळविले असून, त्याची भारतीय नौदलात  नियुक्ती झाली आहे. त्याच्या या यशामुळे गाताडी कुटुंबासह परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अथर्वचे कौतुक करत देशसेवेच्या या महत्त्वपूर्ण प्रवासात त्याने उत्तुंग यश संपादन करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. अथर्वच्या यशाने तरुणांसमोर मेहनत, जिद्द आणि देशसेवेच्या ध्येयाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Previous Post

नवी मुंबईकरांनो, शुक्रवार-शनिवार पाण्याचा वापर जपून करा!

Next Post

बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

Next Post
बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com