• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2026

महापालिकेत बॉम्बची अफवा; धमकीने खळबळ; तपासणीत काहीच आढळले नाही !

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेत बॉम्बची अफवा; धमकीने खळबळ; तपासणीत काहीच आढळले नाही !

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

बेसमेंटपासून सातव्या मजल्यापर्यंत कसून झाडाझडती

‘जॅक’ श्वानाचाही शोधकार्यात सहभाग

महापालिका मुख्यालयातील कामकाज २७ नोव्हेंबरला नियमित सुरू राहणार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने गुरुवारी प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या धमकीची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासन आणि नवी मुंबई पोलीस यंत्रणेने तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविल्या. संपूर्ण मुख्यालय काही मिनिटांत रिकामे करण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने तब्बल तीन तास संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे प्रशासनासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

महापालिका मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त होताच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी तातडीने या संदेशाची माहिती महापौर सुजाताताई पाटील, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि संबंधित पोलीस यंत्रणेला दिली. त्यानंतर पोलिसांच्या मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) संपूर्ण मुख्यालय रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले. मध्यवर्ती ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे मुख्यालयातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना त्वरित इमारतीबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पोलीस यंत्रणा आणि महापालिका सुरक्षा रक्षकांच्या समन्वयातून अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, आपत्कालीन विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी परिस्थिती संयमाने हाताळत संपूर्ण स्थलांतराची कार्यवाही पार पाडली. महापौर सुजाताताई पाटील यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.

चार पथकांकडून तीन तास कसून तपासणी

धमकीची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत नवी मुंबई पोलीस, महापालिका सुरक्षा रक्षक, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि अभियंते यांच्या मदतीने चार स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांनी मुख्यालयाच्या बेसमेंटमधील वाहनतळापासून तळमजला ते सातव्या मजल्यापर्यंत प्रत्येक विभागाची आणि कानाकोपऱ्याची बारकाईने तपासणी केली.

या शोधमोहिमेत ‘जॅक’ नामक श्वानाचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. सुमारे तीन तास चाललेल्या या तपासणीत संपूर्ण इमारत पिंजून काढण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेची तत्पर कामगिरी

या मोहिमेत बॉम्बशोधक पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक अश्विनी कुसुरकर, सहायक पोलीस निरीक्षक नवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच एनआरआय पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही तत्परतेने कार्यवाही केली. महापालिकेचे सुरक्षा रक्षक, आपत्कालीन विभागातील कर्मचारी आणि अभियंत्यांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य केले.

महापालिका मुख्यालयाची सुरक्षा अधिक कडक

धमकीच्या ई-मेलच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने अधिक कडक करण्यात येत आहे. यापुढे महापालिका मुख्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपले वैध ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन महापालिकेच्या सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालयातील नियमित कामकाज सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धमकीच्या ई-मेलमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा विभागाने समन्वयाने केलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

Previous Post

बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com