• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, November 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 27, 2026

सिडकोच्या ८,०८१ घरांची संगणकीय सोडत; ५,४२४ जणांचे स्वप्न साकार होणार!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सिडकोच्या ८,०८१ घरांची संगणकीय सोडत; ५,४२४ जणांचे स्वप्न साकार होणार!

तळोजा, पनवेल, कामोठे, खारघर, वाशी आणि उलवे येथील सदनिकांचा समावेश

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेतील बिगर-ईडब्ल्यूएस (Non-EWS) प्रवर्गातील ८,०८१ सदनिकांची संगणकीय सोडत शुक्रवारी पार पडली. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) १.० अंतर्गत डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमुळे ५,४२४ यशस्वी अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

तळोजा, पनवेल, कामोठे, खारघर, वाशी आणि उलवे या नोडमधील सदनिकांसाठी ही सोडत घेण्यात आली. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांच्या हस्ते संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) श्रीनिवास मोकलीकर, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे (NIC) संचालक लक्ष्मीकांत गर्जे आणि नरेंद्र भामरे उपस्थित होते.

संपूर्ण सोडत प्रमाणित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. सोडत प्रक्रियेपूर्वी अर्जदारांना योजनेतील सहभाग मागे घेण्याची किंवा सदनिकेवरील दावा सोडण्याची संधी देण्यात आली होती. यासाठी सिडकोने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार दहा दिवसांची मुदत देऊन अर्जदारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. निर्धारित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्ज माघारीच्या विनंत्यांचा या सोडतीसाठी विचार करण्यात आलेला नाही.

सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेमुळे नवी मुंबई आणि परिसरातील विविध नोडमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना संधी उपलब्ध झाली आहे. दर्जेदार गृहसुविधा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक जीवनशैली उपलब्ध करून देण्यासाठी सिडको कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Previous Post

नवी मुंबईत टॉवरचे वारे वाहण्यापूर्वीच नामदेव भगत यांनी मांडली सिडको पुनर्बांधणीची भूमिका!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com