• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, November 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 27, 2026

नवी मुंबईत टॉवरचे वारे वाहण्यापूर्वीच नामदेव भगत यांनी मांडली सिडको पुनर्बांधणीची भूमिका!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबईत टॉवरचे वारे वाहण्यापूर्वीच नामदेव भगत यांनी मांडली सिडको पुनर्बांधणीची भूमिका!

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत असून सिडकोनिर्मित जुन्या इमारतींच्या जागी उंच टॉवर उभारण्याचे स्वप्न अनेक सोसायट्यांमध्ये आकार घेत आहे. शहरातील बहुतांश सिडको वसाहतींमध्ये सध्या पुनर्विकास हाच चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मात्र, पुनर्विकासाच्या या चर्चेला व्यापक स्वरूप येण्यापूर्वीच सिडकोच्या इमारतींची पुनर्बांधणी सिडकोनेच करावी, अशी महत्त्वपूर्ण भूमिका सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेना (शिंदे गट) नवी मुंबईचे नेते नामदेव भगत यांनी मांडली होती.

सिडकोनेच नवी मुंबईची नियोजनबद्ध उभारणी केली. शहराच्या विविध नोडमध्ये सिडकोने हजारो निवासी इमारती उभारून सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. मात्र, काळाच्या ओघात या इमारती जुन्या झाल्या असून त्यांच्या सुरक्षिततेचा, देखभालीचा आणि पुनर्बांधणीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत सिडकोने केवळ नवीन प्रकल्प उभारण्यापुरते मर्यादित न राहता स्वतः उभारलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीची जबाबदारीही स्वीकारावी, अशी भूमिका नामदेव भगत यांनी अनेक वर्षांपूर्वी मांडली होती.

खासगी विकासकांच्या माध्यमातून होणाऱ्या पुनर्विकासात रहिवाशांना अनेक अटी, करार, आर्थिक गणिते आणि विकासकांच्या उपलब्धतेवर अवलंबून राहावे लागते. त्याऐवजी सिडकोसारख्या नियोजन प्राधिकरणाने पुढाकार घेतल्यास पुनर्बांधणीची प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने राबविता येऊ शकते, अशी भूमिका भगत यांच्या मागणीमागे होती. यासाठी त्यांनी केवळ स्थानिक पातळीवर चर्चा न करता मंत्रालयीन स्तरावरही पाठपुरावा केला होता.

आज नवी मुंबईतील नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आदी नोडमधील जुन्या सिडको इमारतींच्या पुनर्विकासाचा विषय ऐरणीवर आला आहे. अनेक सोसायट्या विकासकांच्या शोधात आहेत, तर काही ठिकाणी पुनर्विकासाच्या अटी व शर्तींवरून रहिवाशांमध्ये मतभेदही निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोनेच आपल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घ्यावा, ही नामदेव भगत यांची पूर्वीची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे.

नवी मुंबईची निर्मिती करताना सिडकोने नियोजन, पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यांचा समन्वय साधला होता. त्यामुळे शहराच्या विकासातील पुढचा टप्पा असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीतही सिडकोची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. विशेषतः सर्वसामान्य रहिवाशांचे हित, पारदर्शक प्रक्रिया, बांधकामाचा दर्जा आणि पुनर्विकासातील सुरक्षितता या बाबींचा विचार करता सिडकोने स्वतंत्र पुनर्बांधणी धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे.

Previous Post

पुरुष नसबंदीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी नवी मुंबईत विशेष अभियान

Next Post

सिडकोच्या ८,०८१ घरांची संगणकीय सोडत; ५,४२४ जणांचे स्वप्न साकार होणार!

Next Post
सिडकोच्या ८,०८१ घरांची संगणकीय सोडत; ५,४२४ जणांचे स्वप्न साकार होणार!

सिडकोच्या ८,०८१ घरांची संगणकीय सोडत; ५,४२४ जणांचे स्वप्न साकार होणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com