• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, November 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2026

दिव्यांगांच्या सुविधांसाठी नगरसेविका प्रीती भगत मैदानात!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिव्यांगांच्या सुविधांसाठी नगरसेविका प्रीती भगत मैदानात!

ईटीसी केंद्राला भेट देत शिक्षण, प्रशिक्षण व योजनांचा घेतला आढावा

अतिरिक्त सुविधांसाठी पाठपुराव्याची ग्वाही

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वावलंबनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने वाशी प्रभाग क्रमांक १८ च्या भाजप नगरसेविका प्रीती भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी (शिक्षण, प्रशिक्षण व सेवा) केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. उपमहापौर दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पाहणीदरम्यान त्यांनी केंद्रातील शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली.

या भेटीदरम्यान प्रीती भगत यांनी केंद्राचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पालकांच्या अपेक्षा, आवश्यक सुविधा आणि केंद्राच्या कामकाजासंदर्भातील सूचना जाणून घेतल्या. केंद्रातील विविध विभाग, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण पद्धती आणि योजनांच्या अंमलबजावणीचीही त्यांनी बारकाईने पाहणी केली.

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण आणि क्षमता असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि अनुकूल वातावरण मिळाल्यास ते स्वावलंबी होऊ शकतात. त्यामुळे ईटीसी केंद्र अधिक सक्षम आणि सुविधायुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे प्रीती भगत यांनी यावेळी अधोरेखित केले.

केंद्रातील पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या समस्या आणि अतिरिक्त सुविधांची गरज लक्षात घेऊन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि सभागृहाच्या माध्यमातून आवश्यक सुविधांसाठी ठोस पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही प्रीती भगत यांनी दिली.

दिव्यांगांच्या विकासासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नसून त्यांना समान संधी, सक्षम करणाऱ्या सुविधा आणि स्वावलंबनासाठी पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून ईटीसी केंद्र अधिक सक्षम, आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष केंद्राला भेट देऊन समस्या जाणून घेतल्याने आता आवश्यक सुविधांच्या पूर्ततेसाठी पुढील कार्यवाहीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

बालदींच्या आमदारकीविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार!

Next Post

भाजपाचे बँकिंग धोरण मुठभर लोकांच्या हितासाठी: हर्षवर्धन सपकाळ

Next Post
भाजपाचे बँकिंग धोरण मुठभर लोकांच्या हितासाठी: हर्षवर्धन सपकाळ

भाजपाचे बँकिंग धोरण मुठभर लोकांच्या हितासाठी: हर्षवर्धन सपकाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com