नवी मुंबई क्रीडा महोत्सवाचा बक्षिस समारंभ जल्लोषात
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय नवी मुंबई क्रीडा महोत्सव २०१५ची सांगता शनिवारी (३१ जानेवारी) झाली. या महोत्सवाचे बक्षिस वितरण एका नेत्रदिपक कार्यक्रमात जल्लोषात पार पडले.
कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाला महोत्सवामध्ये अजिंक्यपद प्राप्त झाले. महोत्सवातील सर्व स्पर्धामध्ये मिळालेल्या गुणांकनानुसार कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालय (६६ गुण) , कोपरखैरणेचे ज्ञानविकास विद्यालय (३४ गुण ), नेरुळचे पंडीत मोतीलाल नेहरु विद्यालय (३३ गुण ), आणि तुर्भे येथील सामंत विद्यालय (१२ गुण) हे चार शालेय संघ अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकावर राहिले.
लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्या संघांना आणि खेळाडूंना परितोषिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संजीव नाईक, महोत्सवाचे आयोजक आमदार संदीप नाईक, पालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, पालिका शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे, कामगारनेते अशोक पोहेकर, नगरसेवक केशव म्हात्रे, नगरसेवक संपत शेवाळे, नगरसेवक सुरेश शेट्टी, नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेविका शिल्पा मोरे, नगरसेवक अशोक पाटील, जब्बार खान, दिलीप म्हात्रे, उमाकांत नामवाड, पुरुषोत्तम भोईर, उषा भोईर, चंद्रकांत पाटील, जयेश कोंडे, अर्जुन संघवी, दिनेश पारख, राजश्री कातकरी, शशिकांत भोईर, अर्जुन पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ खो-खोपटू श्रीरंग इनामदार आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. सर्व खो-खोपटू संकेत कदम, खो-खोपटू शीतल भोईर, खो-खोपटू नेहा मगर, खो-खोपटू श्रध्दा शिंदे, खो-खोपटू अब्रार बलोच, खो-खोपटू निलेश मोरे, खो-खोपटू शुभांगी एरंडे, खो-खोपटू अरुण कांबळे , टेबलटेनिसपटू अश्विन सुब्रमण्यम, लंगडी खेळाडू अंकिता पवार, चेकबॉल खेळाडू किरण डेग यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी शानदार संचलन करणार्या संघांना देखील पारितोषिके देवून गौरविण्यात आले. प्रथम पारितोषिक बेलापूरमधील ज्ञानपुष्प विद्यालयास मिळाले. दुसरे बक्षिस कोपरखैरणेच्या रा.फ.नाईक संघाने पटकाविले. तिसरे पारितोषिक घणसोली येथील न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलने मिळविले. लोकनेते गणेश नाईक यांनी यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन शालेय खेळाडूंना केले. स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन त्यांनी केले. जे खेळाडू जिंकू शकले नाहीत त्यांनी नाउमेद न होता कठोर परिश्रम करुन पुढील स्पर्धेत विजयासाठी कंबर कसली पाहिजे, असा सल्ला दिला. भारतीय क्रिकेट संघाचे उदाहरण देत तिरंगी स्पर्धेतून भारत बाद झाला असला तरी आयसीसी वर्ल्डकपमध्ये जिंकण्याची क्षमता हा संघ राखून असल्याचे ते म्हणाले.
चांगले आयुष्य जगण्यासाठी नवी मुंबई शहर उपयुक्त आहे. हे शहर पर्यावरणपुरक आहे, असे सांगून या शहरातील युवकांनी विविध क्षेत्रात यश प्राप्त करावे यासाठी लोकनेते नाईक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जीवन हे आनंदाने जगावे, एखाद्या ध्येयप्राप्तीसाठी जगावे, असा सल्ला त्यांनी दिला. जीवनधाराच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. जीवनधाराने जिंकण्याचे संस्कार दिले आहेत असे नमूदक करुन इर्षेने खेळण्याऐवजी खिलाडूवृत्तीने खेळा, असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणात केले.
जीवनधाराच्या माध्यमातून यापुढे देखील खेळाडू घडविण्याची प्रक्रीया सुरु राहिल, अशी ग्वाही आमदार संदीप नाईक यांनी आपल्या मनोगतात दिली. शहरातील मैदाने टिकावीत यासाठी जीवनधारा प्रयत्नशील राहिल, असे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतून तालुकास्तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत आहेत. जीवनधाराच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात तरुणांचा सवारगिण विकास साधण्याचा प्रयत्न राहिल,असे नमूद केले.