नवी मुंबई : नेरूळ गावातील शेखर दत्तात्रय पाटील यांच्या खूनप्रकरणातील हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी नेरूळ गावचे ग्रामस्थ व सिडकोचे संचालक नामदेव भगत यांनी नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे गुरूवारी (दि.26) एका लेखी निवेदनातून केली आहे.
21 फेब्रुवारी रोजी नेरूळ गावचे ग्रामस्थ शेखर दत्तात्रय पाटील (वय 52) यांचा खून झाला असून नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. याबाबत नेरूळ पोलीसांनी तातडीने कारवाई करून एका हल्लेखोराला जेरबंदही केले. त्याबाबत नामदेव भगत यांनी नेरूळ पोलीसांचे अभिनंदनही केले आहे.
या खूनप्रकरणातील अन्य एक आरोपी फरारी असून त्यास त्वरीत अटक करण्याची मागणी करत याप्रकरणी पोलीसांना गावातील एक जागृत ग्रामस्थ या नात्याने पोलीसांना लागेल ते सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.