खाडीक्षेत्रात खारफुटीचे रोपण करताना नवी मुंबईचे ओबामा आमदार संदीप नाईक
संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचा ओबामा या नावाने ओळखल्या जाणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार संदीप नाईकांचे वृक्षप्रेम, वृक्षारोपण व केलेल्या रोपणाचे संवर्धन करण्याची प्रामाणिक तळमळ जगजाहीर आहे. आ. संदीप नाईक हे दरवर्षी ‘ग्रीन होप’ या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी लाखो वृक्षांचे रोपण करत असतात. नवी मुंबईचा कानकोपरा हरीत करण्याचा संकल्प सोडलेल्या व तो संकल्प व्रत म्हणून जोपासणार्या आमदार संदीप नाईक हे ग्रीन होप या संस्थेकडून करत असलेल्या वृक्षारोपणाचे नवी मुंबईकरांना खर्या अर्थांने वेध लागले आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात कुत्र्यांचा छत्र्या उगवाव्यात, त्याधर्तीवर सामाजिक संस्था, शासकीय संस्था आणि राजकीय क्षेत्रातील विविध घटकांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्तमानपत्रात बातम्या छापून येतात. पण रोपण केलेल्या वृक्षांचे जतन व सर्ंवधन कितपत गांभीर्याने केले जाते, हा एक संशोधनाचा भाग आहे. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वृक्षप्रेमी युवा आमदार व नवी मुंबईचे ओबामा या नावाने जनसामान्यांमध्ये ओळखले जाणारे संदीप नाईक वृक्षसंवर्धनातील कामगिरी सर्वच स्तरावर उजवी ठरली आहे. जनहिताय कामे करताना तनमनधन लावून कामे करण्याची संदीप नाईकांची कार्यप्रणाली असल्याने गतविधानसभा निवडणूकीत मोदी लाटेचा प्रभाव असतानाही आमदार संदीप नाईकांच्या लोकहिताय कामांची पोचपावती ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिली. शिवसेना-भाजपा उमेदवारांना नाकारत ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे सुकाणू मतदारांनी पुन्हा एकवार आमदार संदीप नाईकांच्या हाती सोपविले. आमदार संदीप नाईक कामे करतात, पण प्रसिध्दीपासून अलिप्त राहतात. आपण केलेली कामे तळमळीने करत असल्याने त्या कामाची मार्केटींग करण्याची अथवा श्रेय लाटण्याची गरज नसल्याची भूमिका संदीप नाईकांनी वारंवार मांडलेली आहे. केलेल्या विकासकामांना मतदार पोचपावती देतात, कोणत्याही लाटेच्या आहारी न जाता मतदार विकासकामांचीच पाठराखण करतात हा संदीप नाईकांचा मतदारांप्रती असणारा विश्वास मतदारांनी विधानसभा निवडणूकीदरम्यान सार्थ ठरविला.
वृक्षारोपणातील फोलपणा, दांभिकपणा आमदार संदीप नाईकांना सहन होत नाही. त्यांनी आपला संताप वेळोवेळी व्यक्तही केलेला आहे. वृक्षारोपणाच्या एका कार्यक्रमात आमदार संदीप नाईकांनी ‘दरवर्षी झाडे बदलतात, खड्डे मात्र तेच राहतात’ या वाक्यातून त्यांनी वृक्षारोपणातील फोलपणातील झणझणीत टीकास्त्र सोडले होते. गेल्या काही वर्षापासून ग्रीन होप या संस्थेच्या माध्यमातून आमदार संदीप नाईक नवी मुंबई कार्यक्षेत्रात लाखो वृक्षांचे रोपण करतात. निसर्गप्रेमाचा पान्हा नवी मुंबईत नेहमीच अनेकांना फुटतो, त्यातून खारफुटीबाबतचा पुतना मावशीचा लळादेखील अनेकांना पाझरतो. पण संदीप नाईकांनी खाडीप्रवर्ण क्षेत्रात दोन लाख खारफुटीचे रोपण करून नवी मुंबईकरांमध्ये खारफुटी जतनाचा त्यांनी आपल्या कृतीतून संदेश दिला आहे. नवी मुंबईचे ओबामा असणारे युवा आमदार संदीप नाईक वृक्षारोपण करून समाधान न मानता रोपण केलेल्या वृक्षांचे जतन कितपत करण्यात येत आहे, याची वारंवार पाहणी करतात. रोपण केलेल्या वृक्षांचे सर्वाधिक जतन करणार्यांचा ते सत्कार करून त्यांचा उत्साह वाढविण्याचे काम करतात.
दरवर्षी नवी मुंबईच्या कानाकोपर्यात आमदार संदीप नाईकांकडून पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात येतात. याशिवाय रेल्वे स्थानके, बसडेपो वा अन्य सार्वजनिक ठिकाणी नवी मुंबईकरांना आवश्यक असणार्या वृक्षांची रोपेदेखील रोपणासाठी आमदार संदीप नाईक उपलब्ध करून देत असतात. आमदार संदीप नाईकांनी केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य नवी मुंबईकरांपर्यत पोहोचविण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना, पक्षीय पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना मर्यादा पडत असल्याने आमदार संदीप नाईकांनी केलेली लोकहिताय कामे आजही नवी मुंबईकरांपर्यत पोहोचलेली नाहीत. त्या कामांची मार्केटींग राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्यवस्थित झाली असती तर महापालिका निवडणूकीत किमान १० ते १२ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाढल्या असत्या असे संदीप नाईक समर्थकांकडून आजही उघडपणे सांगण्यात येत आहे. पावसाळा अवघ्या १० दिवसावर आलेला असल्याने नवी मुंबईकरांना आमदार संदीप नाईक ग्रीन होपच्या माध्यमातून करत असलेल्या वृक्षारोपण चळवळीचे वेध लागल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.