नवी मुंबई : मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या समस्यांचे निवारण करणारे आमदार म्हणून आमदार संदीप नाईक ओळखले जातात. ‘आमदार आपल्या प्रभागात’ हा लोकोपयोगी उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत. या उपक्रमाअंतर्गत ते गुरुवार, ४ जून रोजी ऐरोली आणि कोपरखैरणे भागातील जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.
महापालिकेच्या ऐरोली प्रभाग कार्यालयात सकाळी ९ वाजता आणि कोपरखैरणे येथील पालिकेच्या प्रभाग कार्यालयात दुपारी २ वाजता आमदार नाईक उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी त्यांच्यासोबत विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. आमदार नाईक यांना भेटण्यास येताना नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरुपात खातेनिहाय आणाव्यात. तसेच त्या कोणत्या विभागाशी संबंधीत आहेत उदा. पालिका, पोलीस, महावितरण इ. याचा उल्लेख त्यावर करावा, असे आवाहन आमदार नाईक यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.