नमुंमपाच्या नगरसेवकांना शरदचंद्र पवार यांचा सल्ला
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी गुरूवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. पवार यांनी सर्व नगरसेवकांना जनतेच्या संपर्कात राहून जनहिताची कामे करण्याचा सल्ला दिला. पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश प्राप्त केल्याबददल पवार यांनी समाधान व्यक्त केले.
महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि नगरसेविका यांना पवार यांनी मार्गदर्शन केले.