चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या संपत्तीमध्ये चार वर्षात दुप्प्ट वाढ झाली आहे. आर.के.नगरमधून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार्या जयललिता यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी 117.13 कोटीची संपत्ती जाहीर केली आहे. चार वर्षांपूर्वी 2011 मध्ये जयललिता यांनी 51.40 कोटीची संपत्ती जाहीर केली होती.
2011 मध्ये जयललिता यांनी श्रीरंगममधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी त्यांनी 51.40 कोटींची चल आणि अचल संपत्ती जाहीर केली होती. सध्याच्या प्रतिज्ञापत्रानुसार अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा असणार्या जयललिता यांच्याकडे 45.04 कोटीची चल तर, 72.09 कोटींची अचल संपत्ती आहे.