नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकाळातच अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याचे, भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
साक्षी महाराज यांनी आतापर्यंत अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता रविवारी अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी साक्षी महाराज यांनी वक्तव्य केल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साक्षी महाराज यांनी नुकतेच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याचे म्हटले होते.
साक्षी महाराज म्हणाले, ‘‘भाजपवर संशय घेण्याची गरज नाही, आमच्याच कार्यकाळात राम मंदिर उभाणार हे निश्चित आहे. आज नाहीतर उद्या होईल, आता तर आमची सत्ता येऊन एक वर्ष झाले आहे. आणखी चार वर्षे आहेत.