लखनौ : ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वर्हाड व नवरा मुलगा आल्यामुळे वधू नाराज झाली. तिने विवाह करण्यास नकार दिल्यामुळे वर्हाडी मंडळींना माघारी फिरावे लागल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
इसानगरमधील गुरदीनपुरवा येथील केशवराम यांच्या मुलाचा विवाह धौरहरा येथील चंद्रभान यांच्या मुलीशी ठरला होता. विवाहाचा मुहुर्त जवळ येऊन ठेपला होता. विवाहस्थळी मोठा उत्साह होता. मात्र, तो उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही.
ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वर्हाड आल्यामुळे मुलीसह तिचे नातेवाईक नाराज झाले. ट्रॅक्टरमुळे आमची अब्रू गेली असल्याचे वधूकडील मंडळी बोलू लागली. विवाह मंडपामध्ये काळी वेळातच जोरदार भांडण सुरू झाले. प्रकरण अखेर पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी समजूत काढून वऱहाडींना माघारी पाठवले. शिवाय, मोठ्या बसमधून वर्हाड आणल्यानंतरच विवाह करण्यास होकार देण्यात आला. अखेर, बसमधून वर्हाड आणल्यानंतर विवाह पार पडला.