उरण : राज्यात लागू केलेल्या तंबाखू, गुटखा खरेदी विक्रीवरील बंदी आणखी वर्षभर कायम ठेवण्यात आली आहे, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
गुटखा, तंबाखू, सुंगधी सुपारी यांच्या साठ्यावर तसेच खरेदी-विक्रीवर, अन्न आणि औषध मंत्रालयाने बंदी घातली आहे. गुटखा आणि पानमसाला यांच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. तरूण पिढीमध्ये या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि यावर बंदी घालणे आवश्यक आहे.
या बंदीवर विविध उच्च न्यायालयात स्थगिती मिळालेली नाही तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा या बंदीला पाठिंबा दिला आहे. 16 डिसेंबर 2004 पासून असणार्या या बंदीची मुदत 19 जुलै 2015 ला संपत होती.
या बंदीमुळे लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत आहेत त्यामुळे ही मुदत तातडीने वाढवणे गरजेचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने ही बंदी अजून एका वर्षासाठी कायम ठेवल्याची घोषणा केली आहे.