निलम पाटोळे :
नवी मुंबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गाव व सभोवतालच्या परिसराचा समावेश असलेेल्या पालिका प्रभाग 93 व 95 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आधार कार्ड व पॅन कार्डचे तीन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रभाग 95 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांचा 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2015 या तीन दिवसाच्या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या नेरूळ गाव, सेक्टर 20 येथील शंकर चांगा ठाकूर चौक, प्लॉट नं सी-103 जवळ, शांघाई हॉटेलजवळील जनसंपर्क कार्यालयात या तीनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 ते सांयकाळी 5 या वेळेत आधार कार्ड शिबिराचे तर सांयकाळी 6 ते 8 या वेळेत पॅन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आलेे आहे. या कार्यक्रमामध्ये नेरूळ नोडमधील रहीवाशांनी सहभागी व्हावे असे आवाहन धनाजी ठाकूर, निरंत पाटील, देवा म्हात्रे आणि नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी संयुक्तपणे केले आहे. या शिबिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्याशी 9870050007 संपर्क साधावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.