गुरुदासपूर (पंजाब)- विवाहितेची छळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेली वादग्रस्त आध्यात्मिक राधे मॉं हिची दोरांगला गावामध्ये घरोघरी पूजा केली जात आहे. या गावात राधे मॉंचा जन्म झाला असून शिक्षणही येथेच झाले आहे.
गावातील प्रत्येक घर व दुकानांमध्ये राधे मॉंचे छायाचित्र लावलेले पाहायला मिळते. गावातील प्रत्येक नागरिक नित्यनियमाने पूजा करतात. महिन्यातून एकदा तरी राधे मॉं गावात येत असते, अशी माहिती गावकर्यांनी दिली.
पंजाबमध्ये राधे मॉंच्या होणार्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावतो. राधे मॉंवर असलेले आरोप हे निराधार आहेत. चौकशीनंतर खरी परिस्थिती समोर येईलच, असे गावातील दुकानदार रोहित महाजन यांनी सांगितले.
राधे मॉं शाळेत असताना वहीच्या प्रत्येक पानावर ‘जय माता दी’ लिहीत असायची. शिवाय, सतत ‘जय माता दी…’ हे गाणे गाताना दिसत असायची, असे सरपंच वारिंदरकुमार यांनी सांगितले.