नवी मुंबई : सालाबादप्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्र. 85 आणि 86 व महिला बचत गटाच्या वतीने नागपंचमी सणानिमित्त बुधवार, दि. 19 ऑगस्ट रोजी महिलांकरीता पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन नेरूळ सेक्टर 12 येथील झुलेलाल मंदीरामध्ये दुपारी 2 ते सांयकाळी 6 या वेळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये नागदेवतेचे पुजन, पोथीवाचन व आरती, पारंपारिक नृत्य, फेरांची गाणी, विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश होता . या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, नगरसेविका सौ. रूपाली भगत, माजी नगरसेविका सौ. स्नेहा पालकर, सौ. माधुरी सुतार, नगरसेविका सौ. तनुजा मढवी उपस्थित होत्या.
स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या कार्यक्रमाच्या संयोजक होत्या. या कार्यक्रमामध्ये नेरुल से. 10, सेक्टर सहामधील, सारसोळे गावातील आणि कुकशेत गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला व आनंदाने उत्सव साजरा केला.