जळगाव : पाथरी (ता.जळगाव) येथील अडतीस वर्षीय विवाहीतेचा कोयत्याने खुन केल्याची घटना पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. लहान भावाच्या बायकोचे बहीणीच्या नवर्याशी अनैतीक संबध असल्याच्या संशयावरुन संजय शिवराम पाटील (वय-48) याने धारदार कोयत्याने भवजाईचा खुन करुन स्वत:ला पोलिस पाटीलाच्या स्वाधीन करुन गुन्ह्याची कबुली दिली. औद्योगीक वसाहत पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन संशयीताला अटक करण्यात आली आहे.
जळगाव तालूक्यातील साडेतीन चार हजार लोकसंख्ये असलेल्या छोट्याशा गावात प्रत्येकी एक एकर जमीनीवर संजय शिवराम पाटील व सुनील शिवराम पाटील दोघा भावांची गुजराण सुरु होती. शेतीला जोड धंदा म्हणुन मोठाभाऊ संजय म्हशी सांभाळायचा तर सुनील टेलरींग व्यवसाय करीत होता. दोघांची मोठी बहीण देवाजी दौलत पाटील यांना बडोदा (गुजरात) येथे दिली आहे. दहा वर्षापासुन देवाजी पाटील व सुनीलची पत्नी वृंदा यांचे अनैतीक संबध असल्याचा संशय संजयला होता. अनेक वेळेस दोघांची नातेवाईक व कुटूंबातील लोकांनी समुजत काढली. दरम्यान दोघा भावांमध्ये जमत नसल्याने मागे सुनील ने मोठ्या भावाला कुर्हाड मारुन जखमी केले होते. नुकताच 15 ऑगस्ट रोजी पाहुणे देवाजी पाटील गावात येवुन गेले. दोन दिवस येथे सुनीलच्या घरात वास्तव्याला असल्याने संजयचा पुन्हा संशय बळावल्याने त्याने दोघांना विनंतीही केली मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आज पहाटे सहा वाजता वृंदा सुनील पाटील ही शौचास गेली असता संजयने तीला गाठून केळीखोड कापण्याच्या धारदार कोयत्याने तीच्या मानेवर हातांवर वार करुन खुन केला.
*** मला पोलिसात जमा करा
वृंदाला मारल्यानंतर संजय पाटीलने थे पाथरीचे पोलिस पाटील संजिव लंगरे यांचे घर गाठत आपण खुन केल्याचे सांगीतले. लहान भावाच्या पत्नीचा खुन केला असून मला पोलिसांच्या स्वाधीन करावे..असे संजयने सांगीतल्याने त्यास औद्योगीक वसाहत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लंगरे यांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.टि.धारबळे करीत आहे.