मुंबई : देशातील १० कामगार संघटनाना बुधवार, दि. २ सप्टेेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात १५ कोटी कामगार सहभागी होणार असल्याची माहिती कामगार संघटना नेत्यांनी दिलेय.
दरम्यान, या देशव्यापी संपात भाजपची कामगार संघटना सहभागी होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र, या संपात सरकारी तसेच खासगी कंपनीतले कामगार सहभागी होणार आहेत. बँक, इन्शुरन्स कंपन्यांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
बँक, वाहतूक व्यवस्था, वीज आदी १२ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरणला विरोध अ्सून वाहतूक सेफ्टी बिल २०१४ बे मजदुरांच्या विरोधात आहे, असे संघटनांनी म्हटले आहे.
सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रिक्षा, टॅक्सी बंद राहणार आहे. केवळ बस सेवा सुरु राहणार आहे. कॉलेज, खासगी स्कूल बस, दुकान तसेच शॉपिंग मॉल बंद राहणार आहे. तर हॉस्पीटल, मेडिकल स्टोअर्स यांना संपातून सुट देण्यात आली आहे. दरम्यान, काही रिक्षा आणि टॅक्सी संघटना या संपात सहभागी झालेल्या नाहीत.