लखनऊ : राखीपौर्णिमा जेव्हा बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि सुरक्षेचं वचन घेते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात राखी बांधून घ्यायला आलेल्या एका विद्यार्थ्यानं एक विचित्र प्रकार केला.
जिल्ह्यातील अपजलगढमध्ये एका इंटर कॉलेजमध्ये जेव्हा एक माजी विद्यार्थी कॉलेजमध्ये राखी बांधून घ्यायच्या निमित्तानं आला. मात्र विद्यार्थिनीच्या भांगेत कुंकू भरून गेला. कॉलेजच्या दहाव्या वर्गात शिकणार्या विद्यार्थिनीकडून राखी बांधून घ्यायच्या निमित्तानं आलेल्या माजी विद्यार्थ्यानं तिच्या केसांमध्ये भांगेत कुंकू भरलं. त्यानंतर तिला आपली पत्नी बनविण्याची धमकी देत पोबारा केला.
या घटनेनंतर कॉलेजमध्ये खळबळ माजली. आरोपी विद्यार्थ्याला शिक्षकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर कॉलेजचे प्रिन्सिपल आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी आरोपी विरुद्ध तक्रार केलीय. सांगण्यात येतंय की, आरोपी मुरलीवाला गावांतील आहे. आरोपीचं विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम करत होता आणि तो खूप काळापासून तिचा पाठलाग करत होता.