नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या असल्या तरीही देशांतर्गत बाजारात मात्र सणावारांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सोने बाजारात सोन्या-चांदीचे भाव वधारले आहेत.
दिल्लीतील बाजारात शुद्ध सोन्याचे भाव 27 हजारांच्याही पुढे पोचले आहेत. प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचे दर 27,060 रुपये झाला आहे. चांदीच्या भावात देखील गेल्या आठवड्यात प्रति किलोमागे 775 रुपयांची वाढ होऊन 35,575 रुपयांवर पोचले आहेत.
बाजारातील जाणकारांच्या मते, दागिने, आभूषण व किरकोळ विक्रेत्यांनी सोन्याची नव्याने खरेदी केल्याने भाव वधारले आहेत. डॉलरच्या तुलनेत रूपयाचे अवमुल्यन झाल्याने आयात महाग झाली आहे. त्यामुळे देखील देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे भाव वधारले आहेत.