संजय बोरकर:- ९८६९९६६६१४
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी ‘जनसुसंवाद’ माध्यमातून ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी सुसंवाद साधणार आहेत.
आमदार संदीप नाईक हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाल्यानंतर गेल्या एक दशकाहून अधिक काळ जनसंपर्काला सातत्याने प्राधान्य देत आले आहेत. ऑक्टोबर २०१४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मोदी लाटेतही संदीप नाईकांनी ऐरोली विधानसभेचा गड राखला तो त्यांच्या घरटी असलेल्या मतदारांशी जनसंपर्कामुळेच. महापालिकेच्या तिसर्या सभागृहात नगरसेवक म्हणून कार्यरत झाल्यावर स्थायी समिती सभापतीपदाच्या तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी ‘सभापती आपल्या प्रभागात’ हे अभियान राबविले होते.
नवी मुंबई शहराचा अधिकांश कानाकोपरा आ. संदीप नाईकांनी पायपीट करून जवळून पाहिला आहे. ऐरोली सेक्टर १४ येथील गुरूद्वाराजवळील लेवा पाटीदार हॉलमध्ये हे ‘जनसुसंवाद’ कार्यक्रमातून ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी सुसंवाद साधणार आहेत. ‘जनसुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आ. संदीप नाईकांशी सुसंवाद साधू इच्छिणार्यांनी आपल्या निवेदनाच्या तीन प्रती आणाव्यात असे आ. संदीप नाईकांकडून कळविण्यात आले आहे. ‘जनसुसंवाद’ कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता ९०२९८०००७०, ८२६८२०७००८, ७६६६६८६७६७ या क्रमाकांवर संपर्क साधावा.