मुंबई : पंधरा महिन्यातील नीचांकी पातळीला घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी ४२४ अंकांनी सावरुन, २५३१८ अकांवर बंद झाला.
शेअर बाजार सोमवारी २५ हजारांच्या खाली बंद झाला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांनी मजबूत झाल्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १२९ अंकांनी सावरुन ७,६८८ वर बंद झाला. मागच्या दोन सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८७० अंकांची घसरण झाली होती.
अन्य आशियाई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही मंगळवारी वधारण झाली. बांधकाम, बँकिंग, धातू, ऊर्जा आणि भांडवली वस्तूंच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.