मुंबई : मुंबई शेअर बाजारात सलग दुसर्या दिवशी तेजीने सुरूवात झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात बुधवारी सकाळी ४२७ अंकांनी वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७८०० पातळीच्या वर सुरू झाला. भारतीय रुपया सकाळी डॉलरच्या तुलनेत १७ पैशांनी (६६.३८) वधारला.
सकाळी बाजाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा सेंसेक्स ४२७.२८ अंकांनी (२५,७४५.१५) वधारला. तर निफ्टीत १२५.८० अंकांची (७,८१४.०५) वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा घसरणारा सेन्सेक्स मंगळवारी ४२४ अंकांनी वधारला. दिवसअखेर तो २५३१७.८७ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी १२९.४५ अंकांनी वधारून ७६८८.२५वर बंद झाला होता. चीन व दुष्काळामुळे गेल्या दोन सत्रात बाजाराचा सेन्सेक्स ८७०.९७ अंकांनी घसरला होता.