ठाणे : महापालिकेने अतिधोकादायक ठरविलेल्या इमारतीत कोणतीही प्राथमिक व्यवस्था न करता जीवित हानीची तमा न बाळगता टपाल कार्यालये सुरूच ठेवण्यात आलेली आहेत. या टपाल कार्यालयात एकूण 22 हजार खाते धारक आहेत कि जे या टपाल कार्यालयात 200 ते 500 नागरिक कामानिमित्त ये-जा करीत असतात. तसेच निवृत्ती वेतन धारक जेष्ठ नागरिक 1600 आहेत. ते महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत आपला जीव धोक्यात घालून पेन्शनसाठी येत असतात.
सदर इमारत अतिशय धोकादायक झाल्याने कधीही कोसळू शकते ज्यामुळे प्राणहानी वार्थिक नुकसान होऊ शकते. तरी सदर इमारतीत कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी टपाल कार्यालयाला तत्काळ पर्यायी व्यवस्था करणे खासदार राजन विचारे यांनी बजाविले आहे.
वरील विषयास अनुसरून सदर टपाल कार्यालयातील कर्मचारी व सर्व नागरिकांचा विचार करून कोणतीही दुर्घटना होऊ नये याबाबत ई. वीरभद्र राव निर्देशक डाकसेवा मुंबई सर्कल, प्रकाश शेवाळे वरिष्ठ अधीक्षक पोस्ट(नवी मुंबई), श्री. द्या शुक्ल सहाय्यक संचालक पोस्टल सर्व्हिसेस(लीगल व बिल्डींग) व अशोक बुरपुल्ले उपायुक्त (अतिक्रमण) ठाणे महानगरपालिका, हेरवडे उपायुक्त ठाणे महानगरपालिका, मदन सोंडे सहाय्यक आयुक्त कोपरी प्रभाग समिती, खांडपेकर कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका, यांच्या सोबत पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौर्याला पांडुरंग पाटील (माजी सभागृह नेता), नगरसेवक गिरीश राजे, नगरसेविका सुरेखा पाटील, भरत चव्हाण कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते.
सदर टपाल कार्यालयास तातडीने ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील हरिश्चंद्र राउत या शाळेत अंदाजे 650 चौ.फुट क्षेत्रफळाच्या जागेत सदर टपाल कार्यालये सुरु करण्यास वरील सर्व अधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत. सदरची व्यवस्था हि तात्पुरत्या स्वरुपात एका वर्षाच्या कालावधीसाठी नियमानुसार भाडे आकारून उपलब्ध करून द्यावे असे सुचवले.
कोणत्याही परिस्थितीत एका वर्षापेक्षा जास्त मुदतवाढ देता येणार नाही याची कल्पना देऊन ज्या जागेवर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात पोस्टकार्यालयाचे आरक्षण होते त्या जागा सुद्धा पोस्टाच्या अधिकार्यांच्या ना करतेपणामुळे हातातून जाण्याची वेळ पोस्ट खात्यावर आलेली आहे याबाबत ठाणे महानगरपालिका हद्दीतील मौजे कोलशेत येथील सर्वे नंबर 132, 133 व 136 या भूखंडावरील पोस्ट व टेलिग्राम करिता आरक्षित असलेले 3700 चौ. मीटर क्षेत्रावर जमीन मालक स्वत: बांधकाम करून देण्यास तयार असताना आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहात याबाबत तात्काळ कार्यवाही सुरु करावी अशी समज देऊन असे हि सुचवले कि पोस्टातील सर्व वरिष्ठ अधिकार्यांना कोणत्याही अडचणीला तोंड देता यावे याकरिता तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन. पोस्टातील अधिकारी कोपरी येथील नागरिकांना सुलभ होईल अशी अन्य पर्यायी जागा मिळते किंवा कसे? याबाबत विचार करीत आहे.
सदर पोस्ट कार्यालयाच्या हलगर्जीपणा इमारत दुर्घटनेमध्ये कोणतेही नागरिक अथवा कर्मचार्याची जीवित व वित्त हानी झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी पोस्ट विभागाची असेल. यावर योग्य ती कारवाई न झाल्यास त्याला शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करून अधिकार्यांना धारेवर धरण्यात येईल अशी समज दिली.
त्याचप्रमाणे ऐरोली व मीरा भाईंदर येथील दुरावस्ता झालेली टपाल कार्यालये तत्काळ दुरुस्त करून पुढील संभाव्य धोका व अनर्थ टाळावा असे आवर्जून बजावले. त्यावर श्री. प्रकाश शेवाळे वरिष्ठ अधीक्षक पोस्ट यांनी नवी मुंबई महापालिका हद्दीतील ऐरोली येथील इलेक्ट्रिक हाउस जवळ सुमारे 4000 चौ.मीटर जागेवर पार्सल हब व पोस्ट कार्यालय अशी अद्यावत इमारत उभारण्यासाठी 12 कोटींची तरतूद केली असून त्याव्यतिरिक्त 27 लाख रुपये संरक्षक भिंतीसाठी तरतूद करण्यात आली आली आहे. तसेच पोस्टाचे अधीक्षक यांनी मा. खासदार राजन विचारे यांनी सदर जागेवरील अतिक्रमण हटवून जागा मोकळी करून दिल्यामुळे हे शक्य झाले असल्याने आभार प्रदर्शित केले. सदर इमारतीचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे, असे सांगितले. यामुळे नवी मुंबई महानगर पालिका हद्दीतील नागरिकांसाठी पोस्टाचे कामकाज सुखकर होईल.