सुजित शिंदे : ७७१८०३६००७
*** करावेतील दुर्दैवी घटना ***
नवी मुंबई ः करावे गावात राहणार्या एका शिक्षिकेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. नुतन भुपेश पाटील (३२) असे या शिक्षिकेचे नाव असून ती महापालिकेच्या माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत होती.
करावे गावात राहणार्या नुतन पाटील या शिक्षिकेने १२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाणी भरण्यासाठी घरातील मोटर चालू केली होती. त्यानंतर गॅलेरीत असलेल्या नळाचा कॉक चाल्ू करण्यासाठी ता ोली होती. मात्र, पावसामुळे मोटरमध्ये उतरलेली वीज नळात देखील उतरतली होती. यावेळी नुतन पाटील हिने नळाला हात लावल्यांनतर तिला वीजेचा झटका लागल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यामुळे तिला नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेंतर एनआरआय पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करुन या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.