सुजित शिंदे : ७७१८०३६००७
वाशी : नवी मुंबई शहराचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६च्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांनी दिली.
नेरूळ सेक्टर सहामधील कंत दर्शन दरबार हॉलमध्ये हे शिबिर भरविण्यात येणार असून सन शाईन हॉस्पिटल आणि नवी मुंबई ब्लड बँक यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले आहे. फ्री चेकअपमध्ये हाईट, वेट, बी.एम.डी, बी.एम.आय, आर.बी.एस, ई.सी.जी, फ्री कन्सलटींग आदींचा समावेश आहे. डॉ. संदीप सोनवणे एम.डी (आएनटी-एमडी) आणि डॉ. निलेश सोनवणे (डी.ऑरथोपेडीक) यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर भरविण्यात आले आहे.
सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यत आरोग्य शिबिर आणि सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत रक्तदान शिबिर संपन्न होणार असून वैद्यकीय तपासणी आरोग्य शिबिरामध्ये सारसोळेच्या ग्रामस्थांनी, कुकशेतच्या ग्रामस्थांनी आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील आणि प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांनी संयुक्तपणे केले आहे.
रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदाना शिबिरामध्ये रक्तदान करून जनसेवा साध्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी केले आहे.