मुंबई : सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहर्यावर फेकली ती शाई नव्हती. ते आमच्या जवानांचे रक्त होते. अशा घटना घडतात तेव्हा बुध्दिजीवींनी लोकांच्या भावनांचा विचार करावा. आम्हाला कसुरीबद्दल आकस नाही पण आम्ही पाकिस्तानच्या विरोधात आहोत.
सुधींद्र कुलकर्णींवर झालेली शाईफेक ही सौम्य प्रतिक्रिया होती असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध आहे.
सुधींद्र कुलकर्णी यांच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी, या शाईफेकीच्या घटनेचे श्रेय मात्र घेतलेले नाही.