• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2015

रहीवाशांनी पाठलाग करून केले भुरट्या चोराला जेरबंद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
रहीवाशांनी पाठलाग करून केले भुरट्या चोराला जेरबंद

नवी मुंबई : दुपारच्या शांततेचा फायदा उचलत कटावणी तोडत बंद घरे लुटणार्‍या एका भुरट्या चोराला सारसोळेच्या ग्रामस्थांनी पाठलाग करून जेरबंद केले. ही घटना बुधवारी दुपारी 4च्या सुमारास घडली असून चोराजवळ पाकीटात नोटांचा बंडल, एक मोठी कटावणी व चार ते पाच मोबाईल सापडले आहेत. सारसोळे गावातील घरक्रमांक 157 वरील दर्शन अपार्टमेंटमधील दोन घरे काही दिवसापूर्वीच लुटण्यात आली असून आजही त्याच बिल्डींगमध्ये हा भुरटा चोर आला असता त्याचा पाठलाग करून सारसोळेच्या ग्रामस्थांनी जेरबंद केले.
दर्शन अपार्टमेंटमध्ये काही घरांना कडी लावून दुसर्‍या मजल्यावरील घर फोडण्याच्या तयारीत हा चोरटा असतानाच बिल्डींगमधील काही लोकांना चाहूल लागली. तिसर्‍या मजल्यावरील रहीवाशी दुसर्‍या मजल्यावर येत असल्याचे पाहून चोरट्याने धूम ठोकली. रहीवाशांनी बराच वेळ पाठलाग करून त्यास जेरबंद करून सोसायटीच्या ठिकाणी त्याला आणले. त्याची झडती घेतली असता खिशात मोठी कटावणी, नोटाचा बंडल आणि चार ते पाच मोबाईल सापडले. चोरट्यास सामूहिक मार पडल्यावर त्याने आपण कल्याण येथे रहात असल्याचे सांगितले. चोरटा हिंदी भाषिक असून ग्रामस्थांनी नेरूळ पोलिसांशी संपर्क साधला आहे. हा चोरटा सापडल्याने व त्याजवळील कटावणी पाहता या परिसरातील अनेक गुन्हे आता उघड होण्याची शक्यता रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे. यावेळी ग्रामस्थांसमवेत कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेेहेर हे उपस्थित होते.

Previous Post

आई वत्सला प्रतिष्ठानच्या दांडीयाचे युवकांना आकर्षण

Next Post

नमुंमपा शाळा क्र. 72, कोपरखैरणे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळणारा नवी मुंबईतील पहिला संघ

Next Post
नमुंमपा शाळा क्र. 72, कोपरखैरणे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळणारा नवी मुंबईतील पहिला संघ

नमुंमपा शाळा क्र. 72, कोपरखैरणे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळणारा नवी मुंबईतील पहिला संघ

मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे विस्कळीत

ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

‘गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली’ - शिवसेना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com