मुंबई : सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज लाचलुचपतप्रतिबंधक खात्याच्या समोर हजर झालेत. त्यांची चौकशी करण्यात आली.
कोंढाणे धरण प्रकरणी काल तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची तब्बल साडे तीन तास चौकशी करण्यात आली. सुनील तटकरे आणि अजित पवार यांना एकाच दिवशी समन्स देण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारही एसीबीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली.
कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर मंगळवारी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबईतील मुख्यालयात उपस्थित राहिलेत. त्यांची 3 तास कसून चौकशी करण्यात आली.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी एसीबीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स धाडले होते. मात्र, समन्स जारी करूनही दोघेही निर्धारित तारखेला उपस्थित राहिले नाहीत. अखेर त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करून आणखी एक संधी दिली गेली.
तटकरे यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने ठाणे येथील एसीबी कार्यालयात उपस्थिती नोंदविली होती. परंतु एसीबी अधिकार्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे तटकरे यांनाच 21 सप्टेंबरला जातीने हजर राहण्याचे समन्स पुन्हा नव्याने बजावण्यात आले होते. त्यानुसार तटकरे यांनी एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली.