नवी दिल्ली : करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय.
घरगुती बाजारात सराफा बाजारात स्टँडर्ड सोन्याची किंमत २६,६७५ रुपये प्रति दहा ग्रामवर पोहचलीय. गेल्या शनिवारी सोन्याची किंमत २६,८५० रुपये प्रति दहा ग्राम होती. तर शुद्ध सोन्याची किंमत १३५ रुपयांनी घसरून २६,८२५ वर पोहचलीय. बुधवारी याची किंमत २७,००० रुपये प्रति दहा ग्राम होती.
चांदीची किंमत १३० रुपये प्रति किलोनं घसरलीय. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रति किलो ३७,७४० रुपये होती.
लंडनमध्येही सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली होती. तसंच हा ट्रेंड अमेरिकेतही पाहायला मिळाला.