नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मानहानीकारकरित्या पराभूत झाला तर केंद्रातील भाजप नेतेच फटाके वाजवतील, असा आरोप संयुक्त जनता दलाने केला आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना के.सी. त्यागी म्हणाले, अमित शहा यांचे वक्तव्य अर्धसत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षातील सर्व नेते बिहारमधील भाजपच्या पराभवानंतर फटाके वाजतील‘ अलिकडेच अमित शहा यांनी बिहारमधील प्रचारसभेत भाजपचा पराभव झाला तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे बिहारमधील अल्पसंख्यांक समुदायाचा अपमान झाला असल्याची तक्रार बिहारमधील महाआघाडीने केली होती.