नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नसून, मोदी हे जातीयवादी नसल्याचे वक्तव्य जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहमद सईद यांनी केले आहे.
एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत सईद यांनी मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. काश्मीरमध्ये सईद यांच्या पीडीपी पक्षासह भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान पुढील आठवड्यात काश्मीर दौर्यावर असून, या दौर्यात ते विशेष पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सईद म्हणाले, की मोदी हे जातीयवादी नसून, त्यांना वेळ द्यायला हवा. दादरीतील घटना भयंकर व दुर्दैवी आहे. मोदी सबका साथ, सबका विकास अजेंडा घेऊन काम करत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, की मोदी भाजपमधील वाचाळवीरांना लगाम लावतील. जम्मू-काश्मीरमध्ये गोहत्येवर घालण्यात आलेली बंदी ही अनेक दशकांपासूनची आहे. त्यामुळे त्याविरोधात आंदोलन करणे चुकीचे आहे. काश्मीरमध्ये भाजपसोबतची आमची युती मजबूत आहे.