• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2015

नाशिकमध्ये टोलनाक्यावरील टोल महागणार !

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नाशिकमध्ये टोलनाक्यावरील टोल महागणार !

मुंबई : मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल ऍन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोट्या वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.
उच्च न्यायालयाने एल ऍन्ड टी टोल कंपनीच्या बाजूने निकाल दिल्याने येत्या काही दिवसात नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे नाशिककरांसमोर एक नवीन संकट उभे आहे.
आर्थिक बोजा लक्षात घेता मुंबईतील पाच नाके आणि पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमधून छोटया वाहनांना सूट देण्याचा निर्णय घेण्याचे राज्य सरकारने सध्या तरी टाळलेय. परिणामी मुंबईतून ये-जा करताना छोट्या वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.
मुंबईतील पाच नाके आणि पुणे द्रुतगती मार्गावरील टोलबंदीबाबत विचार करण्याकरिता अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला ३१ ऑक्टोबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी संपली असली तरी शासनाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.
राज्य शासनाने दिलेल्या मोठ्या सवलती आणि करारानुसार राज्य सरकार वागत नसल्याने जून महिन्यात मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र कुंभमेळ्याची कामे प्रशासनाच्या डोक्यावर असल्याने दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. टोलचा भडका उडू नये म्हणून लोकसभा निवडणुकापूर्वी न्यायालयाचा आदेश असतानाही दरवाढ पुढे ढकलण्यात आली.
त्यामुळे टोल नाक्याला दरमहा १० कोटी रुपये तोटा सहन करावा लागतोय. यासाठी राज्य शासनाने ही भरपाई द्यावी म्हणून एल ऍन्ड टी कंपनीने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिल्याने येत्या काही दिवसात टोल मध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीय.
येत्या काही दिवसात जिल्ह्याधिकार्‍यांच्या सोबत बैठक करून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. यामुळे नाशिक शहरापासून राष्ट्रीय महामार्गावर चक्क दोन टोलच अंतर चाळीस किलोमीटरपेक्षा कमी रहाणार आहे. सव्वाशे रुपयांचा टोल डबल झाल्यास नाशिकहून चांदवडच्या रेणुका देवीचं दर्शन करून येण्यासाठी किमान पाचशे रुपये खर्च येणार आहे.
राज्य सरकारने जरी ग्रामीण भागातील रस्त्यांवर टोल माफ केला असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोलचा फास आता हळूहळू आवळला जातोय. या टोलवाढीला पुन्हा राजकीय रंग चढणार असून येत्या काळात यावरुन पुन्हा मोठा वाद होण्याची शकयता आहे.

Previous Post

केडीएमसीमध्ये शिवसेनेच्या महापौर पराभूत

Next Post

ना समान कामाला समान वेतन , ना बोनसमध्येदेखील समानता !

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

ना समान कामाला समान वेतन , ना बोनसमध्येदेखील समानता !

कल्याण-डोंबिवलीत एमआयएम चार जागांवर विजयी

विजयी उमेदवारांना अज्ञात स्थळी रवाना !

विजयी उमेदवारांना अज्ञात स्थळी रवाना !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com