कल्याण – औरंगाबाद महापालिकेपाठोपाठ एमआयएमने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही विजयाचे खाते उघडले आहे. केडीएमसीमधील मुस्लिम बहुल वस्तीत एमआयएमचे एक-दोन नव्हे तर, चार उमेदवार विजयी झाले आहेत.
एमआयएमचे प्रमुख असादउद्दीन ओवेसी यांना येथे सभा घ्यायची होती. मात्र त्यांना सभेसाठी परवानगी नाकारली होती. नांदेड महापालिका निवडणुकीपासून एमआयएमने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला होता.
प्रथम नांदेड महापालिका निवडणुकीत एमआयएमचे ११ उमेदवार निवडून आले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे औरंगाबाद आणि मुंबईतून दोन आमदार निवडून विधानसभेवर गेले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एमआयएमने २५ जागांवर विजय मिळवला होता.
** एमआयएमचे विजयी उमेदवार
तनझीला अय्याझ मौलवी
शकीला खान
खासीब तन्की
शेख कलीम