बाली: बालीमध्ये छोटा राजनला अटक केल्यानंतर पहिल्यांदाज भारतीय वकालातीचे अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची तुरुंगात भेट घेतलीय.
छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात असून राजनला भारतात आणण्याची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. रविवारी सकाळी भारतीय अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनशी संपर्क साधला. अटकेनंतर छोटा राजनची अधिकृतरित्या भेट घेणारे अग्रवाल हे पहिले भारतीय अधिकारी आहेत.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छोटा राजननं आयुष्यभर मी दहशवाताविरोधात लढलो असून मरेपर्यंत मी याविरोधात लढा देत राहीन अशी प्रतिक्रिया दिलीय.