नवी मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १०० रुपये किलोने तुरडाळ देण्याची घोषणा राणा-भीमदेवीच्या थाटात केली खरी, पण प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना १०० रुपये तुरडाळ हे दिवास्वप्नच राहील अशी परिस्थिती आहे. अजूनही तुरडाळ १५० रुपयांपेक्षा महाग आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई तर्फे शनिवारी सकाळी नेरूळ पोस्ट ऑफिस, नेरूळ बस डेपो (जनता मार्केट) येथे मुख्यमंत्र्यांच्या या फसव्या घोषणेविरुद्ध अभिनव आंदोलन करण्यात आले.
मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ५०-५५ मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्येकी १०० रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्र्यांना केली. या बदल्यात १ किलो तुरडाळ पाठवून द्यायची मागणी यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केली. मनसेच्या या आंदोलनाने मुख्यमंत्र्यांच्या फसव्या घोषणेचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, सचिव ऍड. कौस्तुभ मोरे, महिला सेनेच्या डॉ. आरती धुमाळ, शर्मिला भाडूगळे, गायत्री शिंदे, यशोदा शिंदे तसेच रोजगार विभागाचे सुधीर नवले, आप्पा कोठुळे, अनिकेत पाटील, निखिल गावडे, विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रित तुरमेकर, विभाग अध्यक्ष विनय कांबळे, नितीन खानविलकर, विक्रांत मालुसरे, बाबाजी गोडसे, राजेश ढवळे, निखिल थोरात, विशाल भणगे, हृषीकेश तिडके, अशोक मनोहर, अभिजित देसाई, अजय सुपेकर ,बाळा पाटील, नितीन तळेकर, शिवम कवडे, बाबाजी गोडसे, सागर नाईकरे, जितेंद्र भोईर, स्वप्नील गाडगे, अक्षय भोसले,नितीन तळेकर, कलाम पांगरकर, वैभव बारवे, भूषण बारवे , तसेच मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.